सावंतवाडी : तालुक्यातील कारीवडे- पेडवेवाडी येथे सुमो कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन अपघात झाला. यात प्रवास करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील ८ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
सदर घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धोकादायक वळणार घडली.
अचानक समोरून कुत्र्यांची झुंड आल्यामुळे चालकाने तात्काळ ब्रेक मारला असता गाडी जागेवरच पलटी झाली. संबंधित कुटुंब सावंतवाडी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आले होते.





