मुंबई : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे.
मागील तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून क्रीडा पुरस्काराची नावे जाहीर केली. सन 2019-20 मधील क्रीडा पुरस्कार ठाण्यातील श्रीकांत शरदचंद्र वाड यांना देण्यात आला आहे. तर 2021-22 मधील जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्याच्या स्नेहल विष्णू मांढरे हिला राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. आर्चरी खेळात उत्तुंग कामगिरी करणा-या स्नेहलला सन 2019-20 या कालावधीतील पुरस्कार जाहीर झाला आहे.तीन वर्षांतील एकूण 116 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
गिरीश महाजन म्हणाले, राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.





