सावंतवाडी: येथील वैश्य समाजाच्यावतीने ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्याना सत्कार सोहळा रविवार २३ जुलै रोजी येथील वैश्य समाज सभागृहात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण तर बारावीत ७० टक्क्याहून अधिक गुण आहे त्यांनी आपल्या कागदपत्रासह त्या ठिकाणी उपस्थित रहोव असे, आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.




