चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये नवा अध्याय लिहिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

41

नवी दिल्ली : चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचे कौतुक केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेले ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये एक नवीन अध्याय लिहिला आहे . प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत उंच भरारी घेतली आहे.

ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची साक्ष आहे. त्यांच्या धाडसाला आणि कुशाग्र बुद्धिमत्तेला मी सलाम करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.