मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणार्या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात कमकुवत आर्थिक घटकांसाठी उत्पन्नाचा निकष आता 3 लाख रुपयांवरुन 6 लाख रुपये करण्यात आला असून, त्याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश काढला आहे.





