वागदे येथील ‘त्या’ संशयितास २ दिवसांची पोलीस कस्टडी..!

95

कणकवली : महाराष्ट्र गोवा, आणि कर्नाटक राज्यात घरफोडीचे तब्बल ४५ गुन्हे असलेल्या व मूळ गोवा येथील फरार आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील (वय ३७ वर्षे) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील तो राहत असलेल्या घरातून अटक केली होती.
आज दुपार नंतर कणकवली पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश विनायक पाटील याला कणकवली येथे न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले.