नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल वीके सक्सेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळल्याचे दिसत आहे. यावेळी शिक्षकांना फिनलँडमध्ये प्रशिक्षणासाठी नेण्याचा मुद्दा आहे.
या पार्श्वभूमीर मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीच्या आमदारांनी दिल्ली सरकारच्या कामकाजात कथित हस्तक्षेपाच्या विरोधात आज (सोमवार) उपराज्यापाल कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. दिल्ली विधानसभेची कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली होती.





