BIG BREAKING : सत्तारांनी निवडणूक शपथपत्रात दिली खोटी माहिती..!

87

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला, तेव्हा ही माहिती समोर आली.

एकीकडे मंत्रिमंडळ खाते वाटप, विस्तार आणि मंत्र्यांच्या अदलाबदलीची चर्चा होत असतानाचा सत्तार यांचे हे नवे प्रकरण समोर आले आहे. सिल्लोड न्यायालयात महेश शंकरपल्ली यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शेत जमीन, व्यावसायिक इमारती, निवासी इमारती, शिक्षण आणि जमिनीबद्दल खोटी माहिती दिल्याचे म्हटले होते. या प्रकरणी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी दोनदा तपास सुरू केला. मात्र, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. तिस-यावेळी पोलिसांनी अब्दुल सत्तार यांचा जबाब घेतला. तेव्हा निवडणूक शपथपत्रात नमूद केलेली माहिती आणि या जबाबात तफावत आढळली असल्याचे महेश शंकरपल्ली यांच्या वकिलाने सांगितले.