सावंतवाडी : 2022 – 2023 रोजी घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेमध्ये मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यामध्ये इयत्ता 5 वी मधुन कु.मनिश मनिपाल राऊळ या विद्यार्थ्याने रोख रक्कमेसह तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळवला.तसेच इयत्ता 8वी मधुन कु.जान्हवी गावडे या विद्यार्थीनीने सावंतवाडी तालुक्यात तुतीय येण्याचा मान मिळवला.इयत्ता 5 वी मधुन कु.काव्या कारेकर हि विद्यार्थीनी देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.
द्वितीय श्रेणीमध्ये कु.शुभंकर पाटकर ,कु.चिन्मयी कांग्रलकर, कु.श्रीया मल्हाटकर ,कु.अश्मी नानचे ,कु. आयुश गावडे त्याचप्रमाणे तुतीय श्रेणीमध्ये कु.तेजल जाधव ,कु.अमितेश राऊळ यांनी यश संपादन केले. इयत्ता 8वी मधुन द्वितीय श्रेणीत कु.अनिरुद्ध तारी ,कु.कुणाल वेरेकर ,कु.आदि पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल,पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





