सावंतवाडी : सावंतवाडी येथील मोती तलावामध्ये खासगीलवाडा येथील रहिवासी वयोवृद्ध महिला तलावाच्या पाण्यामध्ये पडून झाडाच्या फांदीला पकडून जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी हात उंचावत होती. सकाळी मॉर्निंग वॉक साठी फिरत असताना येथील नागरिकांना दिसून आली नागरिकांनी प्रसंग ओळखून धावा धाव करून तलावातील होडीच्या साहायाने तिला पाण्यातून बाहेर काढून वाचवण्यात आ त्याप्रसंगी मॉर्निंग वॉक साठी आलेले पोलीस नाईक तसेच माजी नगरसेवक सुरेश भोगटे, आज्या मांजरेकर, संजय मापसेकर, रवी मडगावकर, प्रल्हाद तावडे, राऊळ तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण वालावलकर ,जगदीश दूधवडकर व इतर नागरिकांनी वाचवण्यासाठी धावपळ करून अखेर तिला पाण्यातून बाहेर काढून तिचा प्राण वाचवला व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले.
Home ब्रेकिंग न्यूज ‘तिच्यासाठी’ समाजसेवक बनले देवदूत | मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेचे प्राण वाचवले..!





