माजी कॅप्टन सुभाष सावंत यांच्याकडून कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण..!

312

सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त मधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असणा-या वह्या,कंपासपेटी, चित्रकला रंगसाहित्य इ. शैक्षणिक साहित्याचे वितरण कलंबिस्त गावचे सुपुत्र तथा माजी सैनिक ऑन. कॅप्टन सुभाष सावंत यांच्या आर्थिक योगदानातून केले गेले.

या वितरण कार्यक्रमप्रसंगी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सिताराम सुर्वे, कॅप्टन सुभाष सावंत, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, माजी विद्यार्थी समीर धोंड, रंजना तावडे, रेश्मा राऊळ, न्हानू धुरी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कॅप्टन सुभाष सावंत यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी कॅप्टन सुभाष सावंत यांनी प्रशालेला व विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.