देवगड :- कणकवली देवगड वैभववाडी मतदार
संघाचे आमदार नितेश राणे यांनी शिरगांव हायस्कूलला मंगळवार ११ जुलै राजी दुपारी ३ वाजता भेट देत व शाळेत नुकत्याच बसविण्यात आलेल्या स्मार्ट डिजीटल बोर्डाची माहिती करुन घेतली.
शिरगांव हायस्कूलला भगीरथ प्रतिष्ठान झाराप यांच्या मदतीतून प्राप्त झालेला स्मार्ट डिजिटल बोर्डचा वापर अध्यापन अध्ययन प्रक्रियेत कसा केला जात आहे याची माहिती व त्याचे कार्य जाणून घेण्यासाठी आमदार राणे यांनी शाळेस भेट दिली व स्मार्ट बोर्डचे कार्य जाणून घेतले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शमशुद्दीन अत्तार, मंगेश लोके, शैलेश जाधव, अमोल तेली ,ई .उपस्थित होते.





