मळगावात शाळा कॅालेज ते शेतकरी बांध उपक्रम , राजन तेली यांच्या हस्ते उद्धाटन..!

33

सावंतवाडी :  सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कुल, मळगाव येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगाव व तालुक्यातील महाविद्यालये आणि माध्यमिक विद्यालयांच्या सहकार्याने शाळा कॅालेज ते शेतकरी बांध उपक्रमाचे उद्धाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी युवराज लखमराजे भोसले, ग्रामविकास मंडळ, अध्यक्ष गोडकर, सरपंच स्नेहल जामदार,सरपंच अर्चना सावंत, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, अण्णा देसाई,श्री बिर्जे, गुरुनाथ पेडणेकर श्री फाले, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण प्रवीण मांजरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच यावेळी सर्वांना शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले .