कुणाल शृंगारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी | सांगेली विद्यालयात केले गणवेश, वह्या वाटप..!

47

सावंतवाडी : माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सांगेली येथील 16 मुली व 12 मुले असे मिळून 28 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व वह्या वाटपाचा कायक्रम सावंतवाडी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, कुणाल शृगांरे यांनी केले.

कुणाल शृगांरे दरवर्षी आपला व आपल्या मुलीचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात.त्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शैक्षणिक साहित्य यांचा समावेश असतो.
यावर्षीही सामाजिक कार्यकर्ते कुणाल शृगांरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप केले.

यावेळी त्यांच्यासोबत हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. घावरे, सावंत सर, कोंडवे सर व इतर शिक्षक तसेच सौ. राशी शृंगारे, कुणाल शृगांरे यांची मुलगी नूर्वी शृंगारे, भारती परब, भार्गव धारणकर, स्वप्रिल कमते, संतोष खंदारे आदि उपस्थित होते.