महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या देवगड तालुकाध्यक्ष पदी विष्णू धावडे…!

देवगड : देवगड येथील पत्रकार विष्णू धावडे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या देवगड तालुका कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याचबरोबर सचिव सागर जोईल, उपाध्यक्ष केदार सावंत, सहसचिव गुरुप्रसाद मांजरेकर, खजिनदार सुप्रेम सनये हे पदाधिकारी तर प्रसाद बागवे, राजेन्द्र साटम, रत्नदीप कांबळे, विक्रम सनये, नागेश दुखंडे यांची सदस्यपदी निवड झाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, जिल्हा उपाध्यक्ष समील जळवी, सचिव शिरीष नाईक, खजिनदार संजना हळदीवे, सह खजिनदार संजय भाईप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद धुरी, आनंद कांडरकर, कणकवली सचिव रोहन पारकर आदी उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे जिल्हा कार्यकारिणीने पुष्पगुच्छ देऊन व पुष्पहार घालून अभिनंदन केले, यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विष्णू धावडे यांनी आपले मनोगत व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.