तळवडे भाकरवाडी युवक क्लब २०२३ चषकाचा मानकरी ठरला कोयंडे इलेव्हन कालवी…!

देवगड : देवगड तळवडे येथील भाकरवाडी युवक क्लब तळवडे या मंडळाच्या वतीने मंडळाच्या (२५ वर्ष) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभरात करण्यात आले असून या उपक्रमाची सुरुवात २०२३ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धाच्या माध्यमातून करण्यात आली.

या वर्षीच्या आयोजित क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोयंडे इलेव्हन कालवी संघ प्रथम विजेता ठरला तर उपविजेता पावणाई तळवडे संघ ठरला. प्रथम फलंदाजी करताना कालवी संघाने मर्यादित ६ षटकात ६६ धावा बनविल्या याला प्रत्युतर देताना तळवडे संघाने ४७ धावा बनविल्या. तर तृतीय क्रमांकाचे मानकरी डी.आर.सी.सी. देवगड संघाला गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील मालिकावीर अमोल मोंडकर (पावणाई तळवडे ), उत्कृष्ट फलंदाज मयुर ( कोयंडे इलेव्हन), उत्कृष्ट गोलंदाज महेश घाडी (पावणाई तळवडे) अंतिम सामन्यातील सामनावीर शुभम घाडी ( पावणाई तळवडे ) यांना गौरविण्यात आले .

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे, देवगड पोलीस स्टेशनचे पीआय नीलकंठ बगळे, सरपंच पंकज दुखंडे,राहाटेश्वर उपसरपंच जयप्रकाश गुरव, मंगेश धुरी, केतन खाडये, पोलीस पाटील राजेश साटम, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे विजयकुमार जोशी, मुख्याध्यापक नंदन घोगळे, विश्वास लब्दे, सौ.श्वेता शिवलकर, दत्ताराम भाटकर, कोयंडे ईलेव्हनचे मकरंद कोयंडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी दहावी मध्ये प्रथम आलेला शुभम अनुभवणे, कब्बड्डी मध्ये विभागात गेलेल्या प्रेरणा कुळकर्णी, मानसी लब्दे यांचा सत्कार करण्यात आला.

तर महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक नंदन घोगळे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान च्या वतीने विजय विजयकुमार जोशी यांचा विशेष सत्कार व्यासपीठावर उपस्थित मान्यवराकडून करण्यात आला. २५ वर्षे यशस्वी पूर्ण करून मंडळाचे व गावाचे नाव जिल्ह्यात रोशन केल्याबद्दल अध्यक्ष प्रसाद दुखंडे यांचा सर्व सदस्यांनी शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून स्वप्नील रुमडे, संजय आचरेकर, संदीप कडू, अमर धुरी, मयुर सावंत आणि मयुर मोंडकर ; गुणलेखक म्हणून आबा रुमडे, योगेश धुरी, गणेश लब्दे यांनी तर समालोचक म्हणून इम्रान साठविलकर, मुन्ना साटम, बाबू भांडे यांनी काम पाहिले. मंडळाच्या वतीने स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.