दशावतार प्रेमीसाठी खुश खबर | कुडाळ येथे ८ रोजी संयुक्त दशावतार…!

63

कुडाळ : कुडाळकर, आजगावकर, पवार, म्हापणकर, सातार्डेकर, कदम कुटुंबियांच्या सौजन्याने कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता संयुक्त दशावतार मंडळाचे विराट पर्व अर्थात अभिमन्यू-उत्तरा विवाह’ नाटक होणार आहे. या नाटकाच्या संचात दशावतारातील एकूण २३ कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये गणपती-दादा केळुसकर, रिद्धीसिद्धी- भाई मानकर, किचक – राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक, नारद- चारुहास मांजरेकर, धर्म- मोरेश्वर सावंत, भीम-प्रशांत मयेकर, अर्जुन-दत्तप्रसाद शेणई, नकुल- गणेश हळदणकर, सहदेव – यश राणे, द्रौपदी – रामचंद्र रावले, राजा विराट-केशव खांबल, सुदेष्णा- शिवप्रसाद मेस्त्री, उत्तर- ऋषिकेश पवार, उत्तरा- नीळकंठ सावंत, सुभद्रा – चारुदत्त तेंडोलकर, बलराम – प्रथमेश खवणेकर, कृष्ण-विनायक आजगावकर, रूक्मिणी-अब्दुल नदाफ, इंद्र प्रसाद तवटे, सेवक-दादा केळुसकर, अभिमन्यू- आबा कलिंगण, गंधर्व-उदय भगत, कुंती-सुधीर तांडेल आदी कलाकारांचा समावेश आहे. हार्मोनियम- संकेत कुडव, पखवाज निखिल निकम व झांज- बाबू कोरगावकर यांची संगीत साथ आहे.