कणकवली : राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळसुली गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गुलमोहर, बदाम, सातीवन, आदी झाडे लावण्यात आली.
जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुजाय फर्नांडिस, ग्रां. पं. सदस्य चंद्रकांत चव्हाण, डेव्हिड फर्नांडिस, विकास गोसावी, सागर शिर्के, बाळा भोगले, गणेश दळवी, मयुर दळवी, आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





