उड्डाणपुलाच्या प्रश्नाबाबत साहेबांची एक वेगळी स्टाईल दरवर्षी कणकवलीवासियांना पाहायला मिळते ; मात्र वर्षभर चर्चेत राहणारा प्रश्न काही सुटत नाही…
कणकवली | मयुर ठाकूर : मागील दोन वर्षांपासून कणकवली नरडावे फाटा ते जाणवली गडनदी पूल दरम्यानच्या उड्डाणपुलावरून पावसाळ्यात सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूला धबधबे प्रवाहित होतात, मात्र प्रसार माध्यमांतून बातम्या प्रसारीत झाल्यावर काही वेळा तात्पुरती मलमपट्टी केलेली दिसून येते. मात्र कणकवली शहरातील ओव्हरब्रिजच्या पिलरना धो – धो करून कोसळणाऱ्या पावसातच रंगरंगोटी करतानाचे चित्र दिसून आले आहे. हायवे उड्डाणपुलाच्या प्रश्नाबाबत साहेबांची एक वेगळी स्टाईल दरवर्षी कणकवलीवासियांना पाहायला मिळते. मात्र वर्षभर चर्चेत राहणारा प्रश्न काही सुटत नाही.


मागील दोन वर्षापासून हे वाहणारे धबधब्यांबाबत अनेक वेळा लक्ष वेधून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मात्र यावेळी योग्य तिथे खर्च न करता धो – धो कोसळणाऱ्या पावसात उड्डाणपूलाची रंगरंगोटी करून तिथे तो खर्च वाहून घालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय, याला जबाबदार कोण ? कणकवली शहरात हायवेबाबत उद्धभणाऱ्या समस्या दुरावणार तर दुरावणार केव्हा ? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे.





