वंदे भारत गाडीने कणकवलीत दाखल झालेल्या प्रवाशांचे झाले स्वागत…

42

कणकवली : काल मडगाव ते मुंबई अशी वंदे भारत गाडी सुटून गाडीचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते दृक्श्राव्य माध्यमाद्वारे करण्यात आला . काल शुभारंभासाठी सुटलेल्या गाडीमध्ये केवळ विशेष निमंत्रित आणि माध्यमांचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी यांनी प्रवास केला होता .
आज मात्र खऱ्या अर्थाने मुंबईहून मडगाव कडे जाणारी गाडी पहाटे सुटून वंदे भारतच्या प्रवासी सेवेची सुरुवात झाली . आज (02229 ) या गाडीने कणकवली मध्ये दाखल झालेल्या प्रवाशांचे तसेच गाडीचे पायलट यांचा गुलाब पुष्प आणि कोकम सरबत देऊन सामाजिक कार्यकर्ते उमेश वाळके यांनी स्वागत केले. या प्रवाशांमध्ये मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर हे देखील होते . आज वंदे भारत गाडीने सुमारे 50 ते 60 प्रवासी कणकवली स्थानकावर उतरले .