ग्राहकांची सेवा जपणारे पुजारी इलेक्ट्रॉनिक्स | कणकवलीतील तिसऱ्या शोरुमचा शानदार शुभारंभ ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

124

कणकवली | मयुर ठाकूर  : गेली २३ वर्षे कणकवलीकर व जिल्हाभरातील ग्राहकांच्या सेवेत असलेल्या अशोक पुजारी यांच्या येथील पुजारी इलेक्ट्रॉनिक्स या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुच्या शोरूमचा शुभारंभ नुकताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते पार पडला. शुभारंभप्रसंगी विविध मान्यवरांनी पुजारी इलेक्ट्रॉनिक्स ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पुजारी यांची यापूर्वीच कणकवली शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्सची ‘दोन दुकाने सुरू पुजारी व इतर. आहेत. पुजारी यांनी ग्राहकांना आजतागायत दिलेली उत्कृष्ट सेवा नक्कीच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार समीर नलावडे व मान्यवरांनी काढले.
शुभारंभप्रसंगी पुजारी इलेक्ट्रॉ निक्स चे मालक अशोक पुजारी, ममता पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, बेकरी उद्योजक रजिद्रन कंडियन, उद्योजक राजू मानकर, संजय बिडये आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स संदेश पारकर यांनीही पुजारी दुरुस्ती यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा ओघ दिवसभर सुरूच होता. शोरुममधील विविध नामांकित कंपन्यांच्या वस्तू व माफक दर याचीही ग्राहकांनी प्रशंसा केली.

शुभारंभप्रसंगी समीर नलावडे म्हणाले, अशोक पुजारी २३ वर्षांपूर्वी कणकवलीकरांच्या सेवेत रुजू झाले सुरुवातीला एसी व इतर वस्तुंची दुरुस्ती करता करता ग्राहकांपोटी जपलेली विश्वासार्हता, जिव्हाळा, प्रामाणिकपणा व कामापोटी. असणारी कर्तव्यनिष्ठा या गुणांच्या जोरावर पुजारी यांनी शहरात स्वतःची दोन दुकाने सुरू केली. अर्थात ही दोन्ही दुकाने व त्यातील वस्तू ग्राहकांच्या नेहमीच पसंतीस पडल्या. पुजारी यांची ग्राहकसेवा यापुढेही सुरू राहवी.

अशोक पुजारी म्हणाले, तेव्हा वस्तू रिपेअरिंग कामासाठी कणकवलीत आलो. पण येथे कायमस्वरूपी सेवा द्यावी, अशी ग्राहकांची इच्छा असल्याने २३ वर्षांपूर्वी कणकवलीत स्थायिक झालो. कणकवलीकर व जिल्हावासीयांच्या प्रेमामुळेच व्यवसायात यशस्वी होऊ शकलो. अद्ययावत वस्तुंनी भरलेल्या शोरूमचा शुभारंभ होत असला तर यापुढेही वस्तू रिपेअरिंगचे कामही सुरुच ठेवणार आहोत. त्यासाठी आठ मेकॅनिकल उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांनी निश्चिंत राहवे.
‘पुजारी इलेक्ट्रॉनिक्स’ शोरुमध्ये करता फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशिन, फॅन, कराओके सिस्टीम, वॉटर फिल्टर, इन्व्हर्टर, मायक्रो ओवन, इस्त्री, होम थिएटर, मिक्सर, डिप फ्रीजर, वॉटर कुलर कशा इलेक्ट्रॉनिक्स प्रकारातील सर्वच वस्तू उपलब्ध आहेत. माफक दर, उत्कृष्ट दर्जा हे वैशिष्ट्य आहे. ग्राहकांनी शोरुमला भेट द्यावी, असे आवाहनही पुजारी यांनी केले.

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या वाढदिनी शोरुम शुभरंभाचे नियोजन केले होते. परंतु ते परदेशात गेल्याने शोरुम शुभारंभास उपस्थित राहू शकले नाहित, असे पुजारी यांनी सांगितले.