जामसंडे फाटक क्लास (वडांबा) गटाराच्या प्रस्तावित कामाची साबा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केली पहाणी…!

262

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील देवगड निपाणी महामार्गावर असलेल्या फाटक क्लास (वडांबा स्टॉप) या ठिकाणी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्यामुळे बहुतेक वेळा या ठिकाणी रस्त्यात पाणी साचून हा मार्ग पूर्ण बंद होतो.काहीवेळा वाहन चालकांना पाण्यातूनच वाहने मार्ग करावी लागतात.

कित्येक वेळा या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा देखील होतो. पर्यटन दृष्ट्या देवगड शहराचे वाढते स्वरूप पाहता गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायतच्या विद्यमान नगरसेविका सौ तन्वी चांदोसकर यांनी या ठिकाणी साचणारे पाणी मार्गस्थ होण्यासाठी या ठिकाणी पाईप टाकण्यात यावेत यासाठी निधी मिळावा अशी मागणी नगरसेविका सौ तन्वी चांदोसकर यांनी आमदारांनी नितेश राणे यांच्याकडे केली होती.

या प्रस्तावित कामाचा प्रस्ताव तातडीने शासनाजवळ पाठविण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा हे प्रस्तावित काम लवकर पूर्णत्वास जाईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे.या कामाची नुकतीच पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता श्री सर्वगोड यांनी शनिवारी सकाळी केली असून हे काम तातडीने चालू करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांनी संबंधित अधिकाराना दिल्या आहे. लवकरचं प्रत्यक्ष काम हे चालू होईल व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.असे यावेळी सर्वगोड यांनी सांगितले.या पहाणी दरम्यान उपकार्यकारी अभियंता बासुतकर ,शाखा अभियंता नवपुते ,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर,युवा शहर मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील,आदी उपस्थित होते.