बांदा : कास येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये आरवली (ता. वेंगुर्ले) येथील श्री देवी जागबाई रवळनाथ पंचायतन देवस्थान समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रोत्साहन म्हणून आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कास पूर्ण प्राथमिक शाळा कास नं. १ ही अत्यंत ग्रामीण भागात असूनही शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. प्रशालेतील शिक्षक हे उपक्रमशील असून विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकताना दिसत आहेत. अशा मुलांना आणि उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे याच हेतूने हा खारीचा वाटा उचलत आहोत, असे सीताराम भगत यांनी सांगितले.
याप्रसंगी सीताराम भगत, सीता भगत, पूर्वा भगत, स्वाती नाईक, महेश पालव तसेच सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.





