फर्स्ट इन फर्स्ट आऊट मात्र दाखले नॉट आउट, 2 दिवस अधिकाऱ्यांचा कोड ब्लॉक..!

72

सावंतवाडी :  विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळत नसल्याने फर्स्ट इन फर्स्ट आऊट ही कार्यप्रणाली शासनाने तात्पुरती स्थगित केली आहे.मात्र सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार यांचा कोड ब्लॉक झाल्यामुळे नायब तहसीलदारांच्या कोड वरील दाखले सगळे नॉट आउट राहिले आहेत.हा कोड चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने तो ब्लॉक झाला आहे आणि याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहे.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आता खऱ्या अर्थाने ऑनलाइन प्रणाली बाबत नव्याने प्रशिक्षणाची गरज आहे का असा सवाल उपस्थित होत आहे?अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांचे यांचे दाखले अडकून पडल्याने लाभार्थी हवाल दिल झाले आहेत.

लवकरात लवकर दाखले मिळावेत यासाठी शासनाने कोणतीही कार्यप्रणाली जरी अमलात आणली तरी अधिकाऱ्यांची मानसिकता आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा ही जोपर्यंत गतिमान होत नाही तोपर्यंत सर्व काही नॉट आउट आहे.या सर्व प्रकाराकडे सावंतवाडी तहसीलदार आणि प्रांताधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का?अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.