विलवडे धरण परिसर प्लास्टिक पिशव्या मुक्त..

195

बांदा : एस आर दळवी फाउंडेशन ग्रामपंचायत विलवडे व जलसंधारण विभाग सावंतवाडी तसेच राजा शिवाजी विद्यालय विलवडे यांच्या संयुक्त विद्यमाने विलवडे धरण परिसरातील प्लास्टिक कचरा तसेच काचांच्या बॉटल मोठ्या प्रमाणात कचरा जमा करून साफसफाई केली त्यासाठी एस आर दळवी फाउंडेशन चे कार्यकर्ते सरपंच विलवडे प्रकाश दळवी जलसंधारण अधिकारी धोत्रे साहेब राजा शिवाजी विद्यालय विलवडेचे मुख्याध्यापक हेवाळेकर सर बांदेकर सर कांबळे सर पाडवी सर तसेच राजा शिवाजी विद्यालयातील सर्व मुले यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन साफसफाई चा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सरपंच विलवडे या नात्याने मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो यापुढेही प्रत्येक वाडीमध्ये आठवड्याला एक दिवस यानुसार दळवी फाउंडेशन ची टीम कार्यरत राहून साफसफाईचा कार्यक्रम राबवणार आहे. तसेच पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने धरण परिसरावर अमृत सरोवर निमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड जलसंधारण विभाग सरपंच ग्रामपंचायत विलवडे व एस आर दळवी फाउंडेशन चे सर्वेसर्वा सन्माननीय आबाजी दळवी यांच्यामार्फत वृक्ष लागवड करण्यात आली