संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजने करिता दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या उत्पन्नात दाखल्याची अट शिथिल | ५ वर्षांनी एकदा द्यावा लागणार उत्पन्न दाखला

136

सावंतवाडी – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद होती.मात्र ही अट आताशीतील करत पाच वर्षांतून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सदर योजनेतील ५० वर्षावरील लाभार्थ्याच्या अडी अडचणी विचारात घेऊन उत्पादाखला दरवर्षी घेण्याची अट शिथिल करुन संजय गांधी निराधार अनुदान योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील ५० वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यासाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो ५ वर्षातून एकदा घेण्यास शासनाने मान्यता दिला आहे.शासनाने घेतलेले या निर्णयामुळेवयोवृद्ध व्यक्तींनाउत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट,शासकीय कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे व त्यामुळे त्यांची होणारी ओढाताण आता थांबणार आहे.यामुळे पेन्शनधारक वयोवृद्धांकडून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.