वाढदिवस लोकनेत्याचा; संकल्प वृक्ष लागवडीचा

72

देवगड : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेविका सौ तन्वी योगेश चांदोसकर यांच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी देवगड समुद्रकिनारी १०० वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार २३ जून रोजी सकाळी ७.३० वाजता देवगड बीच येथे वृक्ष लागवडीसाठी पर्यावरण प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेविका सौ तन्वी योगेश चांदोसकर यांच्या वतीने करण्यात आले आहे,