आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवस देवगड मध्ये होणार विविध उपक्रमांनी साजरा.!

77

देवगड :  कणकवली  देवगड – वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देवगडच्या वतीने २३ जून रोजी पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता देवगड खरेदी विक्री संघ मुकुंदराव वासुदेव फाटक सभागृह येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच देवगड ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना दाखले व शालेय ऍडमिनेशन साठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखल्यांची पूर्तता लवकरात लवकर करून ते दाखले देवगड तहसील कार्यालयातून मिळवून देण्यासाठी मोफत व्यवस्था देवगड भारतीय जनता पार्टीच्या वतीने केली जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी दिली. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत देवगड तालुक्यात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार देखील होणार आहेत.