….नाहीतर होणार दंडात्मक कारवाई
कणकवली : कणकवली शहरात होणारी वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणी बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने यावर दंडात्मक कारवाई केली जात असून शहरात ठिकठिकाणी नगरपंचायत प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून बोर्ड लावण्यात आले आहेत. जर यानंतर बोर्ड लावलेले असतानाही त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात असतील तर त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी दिली.





