गटार बांधण्यासाठी निधी द्यावा; नगरसेविका चांदोस्कर यांची आमदार राणेंकडे मागणी…!

106

देवगड : देवगड निपाणी रोडवरील फाटक क्लास येथे पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक ठप्प होते. या ठिकाणी तातडीने गटार बांधण्यासाठी शासन स्तरावरून नीधी उपलब्ध करून द्यावा .अशी मागणी देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेविका सौ तन्वी चांदोसकर यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये जामसंडे फाटक क्लास (वडांबा) येथे पाऊस जास्त पडल्याने पाणी साचून निपाणी रस्ता बंद होतो. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तरी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यालगत गटार मारणे.( देवगड निपाणी रस्ता रा.म. १७८ किमी २/१५० किमी २/४८० मध्ये डाव्या बाजूस आरसीसी बिल्डअप गटार बांधणे या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोसकर यांनी केली आहे