सिंधुदुर्ग :बिपर जॉय वादळामुळे अरबी समुद्राला उधाण आलय. मालवण समुद्र किनारी देखील मोठं मोठ्या लाटा उसळत असून 13 जून पर्यँत मालवण ते वसईच्या किनार पट्टी भागात 3.5 ते 5.1 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे येत्या काळात कोणीही समुद्रात प्रवेश करू नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याच खवळलेल्या समुद्रकिनारी पर्यटकांची स्टंटबाजी पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून तसेच स्थानिकांकडून समुद्रकिनाऱ्यांपासून दूर रहा अशा सूचना मिळून देखील पर्यटक आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.





