सावंतवाडी : मळेवाड मुरकर वाडी येथे वीजेचा पोल मोडला असून या घटनेला चार दिवस उलटून गेले तरी अद्याप पर्यंत तो पोल बदलण्यात आला नसल्याने काही ठिकाणचा वीज पुरवठा बंद आहे.एकीकडे सरकार शेतकऱ्यांना विजेच्या सोयी सुविधा देण्याच्या घोषणा करत असून दुसरी कडे वीज वितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
हा पोल बदलण्याबाबत वीज अधिकाऱ्यांना विचारले असता ठेकेदाराकडे कामगार नाहीत,ठेकेदाराकडे वेळ नाही अशी उत्तरे दिली जात आहेत.वीज पुरवठा बिल भरण्यास विलंब झाल्यास तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्याची तत्परता दाखविणारे अधिकारी चार दिवस खंडित असलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात असून वीज पुरवठा उद्या पर्यंत पूर्ववत न झाल्यास शेतकरी आपली गुरे घेवून वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.एकूणच महावितरण चे काम आणि ठेकेदार येई पर्यंत थांब असा वीज वितरणचा कारभार झाला आहे.





