विलवडे : येथील पत्रकार अजित दळवी यांच्या घरात भर दुपारी धाडसी चोरी झाली आहे. घराचा मुख्य दरवाजा फोडून कपाटातील रोख ६ हजारांची रोकड घेfऊन अज्ञात चोरटा पसार झाला. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. थोड्याच वेळात ठसेतज्ञ व श्वानपथक दाखल होणार आहे. दळवी यांच्या घरातील वर्षभरातील ही चोरीची दुसरी घटना आहे.
पत्रकार अजित दळवी हे आपल्या पत्नी व मुलीसमवेत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बांदा बाजारपेठेत आले होते. हीच संधी साधून चोरट्याने प्रथम घराच्या मागील बाजूने पडवीवर चढून कौले काढून किचनमध्ये प्रवेश केला. मात्र किचनच्या दरवाजाला चावी असल्याने त्याचा घरात जाण्याचा बेत फसला. त्यानंतर त्याच मार्गाने माघारी येत त्याने समोरील मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.





