सावंतवाडी नेमळे ते वेत्ये महामार्गावर वारंवार अपघात | ग्रामस्थांनी छेडले आंदोलन

100

सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गावरील झाराप – पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर नेमळे ते वेत्ये दरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी या मागणीसाठी नेमळेसह वेत्ये, मळगाव येथील ग्रामस्थांनी नेमळे फौजदारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडले. यावेळी महामार्ग रोखला म्हणून रूपेश राऊळ व सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान उद्या मंगळवारी अधिकाऱ्यांनी चर्चेचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

नेमळे महामार्गावर फौजदारवाडी सर्कल येथे महामार्ग रास्तारोको आंदोलन छेडण्यासाठी तीन तास नेमळे, मळगाव व वेत्ये येथील ग्रामस्थांनी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी काहीकाळ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. सावंतवाडी पोलिसांनी या आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त केले .राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उद्या मंगळवार दि.६ जून रोजी दुपारी दोन वाजता नेमळे येथे दाखल होणार आहेत त्यांच्याशी आंदोलक चर्चा करणार आहेत. त्यामुळे सोमवारचे रास्ता रोको आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे .

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात नेमळे सरपंच सौ दिपीका भैरे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे ,अजित सांगेलकर, सखाराम राऊळ, शाखाप्रमुख सचिन मुळीक अजय राऊळ दत्तप्रसाद गवस महेश शिरोडकर अशोक परब आधी आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात सुमारे तीनशे चारशे लोक सहभागी झाले होते असा दावा करण्यात आला आहे. अपघात रोखण्यासाठी महामार्गाच्या ठिकाणी बायपास रोड व्हावा, उड्डाणपूल बॉक्ससेल उभारण्यात यावे ,असलेल्या बॉक्ससेल मधील चिखल काढण्यात यावा महामार्गावर मळगाव येथे महामार्गावर कायमस्वरूपी दोन पोलीस ठेवण्यात यावे, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. मळगाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कठड्यावर बसून दारू पिऊन रस्त्यावर बाटल्या टाकणाऱ्या वर कारवाई करावी आदी मागण्या आंदोलकांनी केलेल्या आहेत तसेच अलिकडे अपघातात ठार झालेल्या विनायक पांगम यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यात यावी तसेच अपघात करणाऱ्या गाडीचा शोध घेण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.