मालवणात ‘द केरला स्टोरी’ मोफत शो ; मामा वररेकर नाट्यगृह येथे उद्घाटन.!

45

मालवण : भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून मालवण तालुका भाजपतर्फे रविवारी मालवण मामा वरेरकर नाट्यगृह येथे ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे मोफत ३ शो आयोजित करण्यात आले.

याचे उद्घाटन डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. मिलींद कुलकर्णी, दत्ता सामंत, सुनील धुरी यांनी विचार मांडले. हिंदू धर्माचे रक्षण, सुरू असणारी धर्मांतरे रोखणे, मुलांना आपल्या हिंदू धर्मा बद्दल माहिती देणे, शिकणाऱ्या मुलींनी कसे सावध राहावे याबाबत मार्गदर्शन करताना अन्य धर्माचा द्वेष नाही मात्र हिंदू धर्माचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धर्मांतर म्हणजे नकळत राष्ट्रांतार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मांतर केलेल्या अनेकांना त्यावेळी पुन्हा हिंदू धर्मात आणले. याबाबतही विचार डॉ. कुलकर्णी यांनी मांडले. धर्मांतर थांबले पाहिजे अन्यथा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. असे दत्ता सामंत यांनी सांगितले तर सुनील धुरी यांनी आपल्या जिल्ह्यातही अनेक धर्मांतर प्रकार सुरू असल्याची आकडेवारी सांगितली.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पूजा सरकारे, शहर प्रभारी विजय केनवडेकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, विकी तोरसकर, रत्नाकर कोळंबकर, राजू बिडये, मंदार लुडबे, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, राज कांदळकर यासह अन्य उपस्थित होते.

दुसरा शो दुपारी ३ वाजता आहे. यावेळी भाजप जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर व भाऊ सामंत यांची प्रमुख उपस्थिती, सायंकाळी ७ वाजता शो वेळी डॉ. सुभाष दिघे व ऍड. समीर गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती.

प्रत्येक हिंदू आईने आपल्या मुलीसोबत पहावा, प्रत्येक हिंदू बापाने पत्नी व मुलीसोबत पहावा, प्रत्येक हिंदू भावाने लाडक्या बहिणीसोबत पहावा, प्रत्येक हिंदू मुलीने बहिणीसोबत मित्रांनीसोबत आपल्या वर्तमानकाळ व भविष्य काळासाठी पहावा तसेच स्वतःच्या सुरक्षेसाठी व देशाच्या सुद्धा सुरक्षेसाठी पहावा असा चित्रपट आहे. असे मालवण भाजपच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला