तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा..!

75

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचे स्विमिंग पूल चालवायचा ठेका देताना कागदपत्राची शहानिशा न करता चुकीच्या पद्धतीने ठेका चालवायला दिला, याबाबत तक्रार नोंदवूनही सदरच्या तक्रारीची दखल तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी घेतली नाही त्यांच्या या निष्काळीपणामुळेच स्विमिंग पूल मध्ये एका युवकाला आपला जीव गमवावा लागला ,यामुळे पोलीस प्रशासनाने ठेकेदारावर गुन्हा दाखल केला इथपर्यंत हे प्रकरण न थांबता मुख्याधिकारी यांच्यावरही सदरच्या मृत्यूस जबाबदार दरुन सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा समाज सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केली आहे.

सावंतवाडीती जिमखाना मैदानावरील स्पोर्ट्स काॅम्पेलक्स मधील स्विमिंग पूल हे सावंतवाडी शहरवासी यांचे आकर्षण आहे,मार्च, एप्रिल,मे ,महिन्यामध्ये तर या स्विमिंग पूमध्ये प्रचंड गर्दी असते, हे स्विमिंग पूल काही महिने नगरपालिकेने चालविले होते,त्यानंतर दुरुस्तीच्या कारणासाठी दोन वर्ष स्विमिंग पूल बंद ठेवण्यात आले होते, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, यांच्या कारकिर्दीत स्विमिंग पूल चे काम अंतिम टप्प्यात आले होते,त्यानंतर दुसरे माजी नगराध्यक्ष संजू परब, यांनी राहिलेले काम पूर्ण करून घेतले व पूढे नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागली,
‌‌ ही प्रशासकीय राजवट असताना सावंतवाडी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी स्विमिंग पूल व इतर महत्त्वाच्या कामाचा निविदा काढल्या स्विमिंग पूल ची निविदा ज्या ठेकेदाला मंजूर करण्यात आली, त्या निविदे सोबत चुकीची कागदपत्रे जोडली गेल्याचा आरोप सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी केला होता, याची शहानिशा न करतात मुख्याधिकारी जावडेकर यांनी सदरचा ठेका मुळीक नामक व्यक्तीस दिला,सदर व्यक्तीने स्विमिंग पूल चालविण्यासाठी जी कागद पत्रे आवश्यक होती ती चुकीची जोडली असा आरोप त्यावेळी करण्यात आला,मात्र त्याकडे जावडेकर यांनी लक्ष दिले नाही, तासाला तीस रुपये दर असलेले स्विमिंग पूल सदरच्या ठेकेदाराने 70 रुपयांवर नेऊन ठेवले, शिवाय त्या स्विमिंग पूल मध्ये प्राथमिक, अत्यावश्यक उपायोजना करायला हव्या होत्या त्या केल्या गेल्या नाहीत.

ट्रेनर लाइफ गार्ड याबाबतची प्रमाणपत्रे बोगस तयार करून जोडली गेली, यावर कळस की काय म्हणून एका महिला शासकीय अधिकाऱ्याची ही प्रमाणपत्र ट्रेनर म्हणून जोडले गेले, याकडे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, यामागे त्यांना कोणाचा दबाव होता की अन्य काही प्रभावाखाली त्यांनी हे कृत्य केले याची शहा निशा होणे गरजेचे आहे ,स्विमिंग पूल अत्यंत संवेदनशील विषय आहे, सर्व जण जिवा पलिकडे जपलेली आपली मुले मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे पाठवतात,त्याच्या जीविताची काळजी घेणे हे संबंधितांची जबाबदारी आहे, एवढेच नव्हे तर तो ठेका चालवायला देणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचेही तेवढीच जबाबदारी आहे, त्यामुळे नगरपालिका प्रशासनाला याबाबत हात झटकता येणार नाही.

सावंतवाडी नगरपालिकेचे खासकीलवाडा शिल्पग्राम येथे पर्यटन हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल ही आहे व त्या स्विमिंग पूल वर ट्रेनर म्हणून काम करण्यात आले अशी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली तशा प्रकारचा अधिकार संबंधित रिसॉर्ट चालकांना आहे काय ?संबंधित संबंधित रिसॉर्ट चालकाकडे लाईफ गार्ड कोण आहे? त्यांनी याबाबतचे प्रशिक्षण कोठे घेतले? त्यांना अशा प्रकारची प्रमाणपत्रे देता येतात काय? याचा तपास होणेही गरज आहे? नाहीतर डबक्यात पोहणाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेऊन काहीजण जनतेच्या जीवनाशी खेळ करण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही असा प्रयत्न होत असेल तर तो हाणून पडला पाहिजे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकवतोय म्हणून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी सदर स्विमिंग पूलाचा ठेका त्वरित काढून घेण्यात यावा, या प्रकरणाची पूर्ण चौकशी होई पर्यंत ते स्विमिंग पूल बंद करण्यात यावे, त्या स्विमिंग पूलावर तज्ञ प्रशिक्षक नेमण्यात यावा जीवनाची सुरक्षा घेतो तो लाईफ गार्ड चांगल्या संस्थेत प्रशिक्षण घेतलेला असावा व त्या संस्थेला तशा प्रकारची प्रमाणपत्रे देण्याचाअधिकारा असावा अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी नेमण्यात यावे, टे़डरही असे निवडले जावे की त्या ठेकेदाराकडे मान्यता प्राप्त संस्थेची अशा प्रकारची प्रमाणपत्र असतील त्या ठेकेदाराला तो ठेका देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

लालसे पोटी, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणीतरी नगाला नग उभा करुन कोणाची तरी प्रमाणपत्र जोडली ती ही बोगस,त्याची सत्यता न पडताळता अशा प्रकारचा ठेका दिला गेल्यामुळेच आज हा प्रसंग ओढावला आहे .पोलिसांनी प्रथमदर्शनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र ज्यांनी हा ठेका सदरच्या ठेकेदाराला चालवायला दिला त्याच्या संपूर्ण कागदपत्राची, त्यांच्या सत्यतेची पडताळणी केली नाही, कुणाच्या तरी दबालाला ,आमीशाला बळी पडून सदरचा ठेका दिला गेला त्यामुळे ठेका देणारी यंत्रणा, सावंतवाडी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निलंबित करून, त्यांच्यावरही सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा याबाबत मुंबई उच्च न्यायालयात मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन यांना प्रतिवादी करून दावा दाखल करावा लागेल असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला आहे

हा प्रश्न सावंतवाडीच्या अस्मितेशी निगडित आहे, अशा प्रकारच्या कोणाच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही, याची गंभीर नोंद संबंधितांनी घ्यावी