…नाहीतर इथून हलणार नाही | हळवल ग्रामस्थांची महावितरणच्या कार्यालयावर धडक| अधिकाऱ्यांची मनमानी चव्हाट्यावर | अधिकारी फोन बंद करून नॉटरिचएबल..!

92

कणकवली : अजून पावसाला सुरुवात झाली नसून काल अवकाळी पावसाची बरसात झाली. असे असताना हळवल गावात कालपासून लाईट नाहीय. अधिकारी कर्मचारी अशा प्रसंगी आपले मोबाईल फोन बंद करून ठेवतात. ग्रामस्थांच नेहेमीच सहकार्य असून देखील अधिकारी कर्मचारी मनमानी करतात. सेक्शन ऑफिसर महावितरण कार्यालयाबाहेर. हळवळ ग्रामस्थ संतप्त जमावाने जमा झाल्यावर तेथील श्री. बगाडे यानी सेक्शन ऑफिसर ना फोन केल्यावर फोन बंद करून ठेवला. मुळात महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. लाईनमन गोसावी यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला.

मात्र गावातील लोक हे दुसऱ्या रात्री पर्यंत अंधारात असल्याने संतप्त होत महावितरण कार्यालयावरच धडकले. दरम्यान जी धावपळ कालपासून करायला पाहिजे होती तीच धावपळ त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ग्रामस्थांनी संतप्त होत आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा कालपासून आत्तापर्यंत हळवल गावात लाईट सुरु करण्यासाठी कोणते प्रयत्न केले ? याबाबत जाब विचारला. या प्रश्नाचे उत्तर त्या अधिकाऱ्यांकडे नव्हते. मात्र महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांची सुरू असलेली मनमानी चव्हाट्यावर आणली.

यावेळी मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी अगोदर तुम्ही सर्व्हे करून पुढे काय केलात ? असे विचारत लाईट सुरू करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही असे ठणकावले. पावसाळ्या पूर्वी महावितरणने काय नियोजन केले आहे ते सांगा ? लाईट किती वेळात सुरू करणार ते सांगा ?अन्यथा आम्ही इथून हलणार नाही. महावितरण चे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते हे येथील मुख्य अधिकार असून ते देखील फोन बंद करून बेपत्ता असल्याचा आरोप देखील संतप्त ग्रामस्थांनी केला.

यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, सुशील सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, हळवलचे माजी उपसरपंच प्रदीप गावडे, प्रकाश पवार, प्रशांत गावडे, भरत गावडे, सुदर्शन राणे, मनोहर गावडे, मंगेश गावडे, सुभाष परब, विजय परब, संजय गावडे, दीपक परब, चंद्रकांत परब, रोहित राणे, कैलास परब उपस्थित होते