कणकवली : कणकवली शहरात आज सायंकाळी 4.30 च्या दरम्यान वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कणकवली शहरात मराठा मंडळ रोड वर झाड कोसळले त्यामुळे येथील रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद झाला. तसेच येथील विजेच्या तारा देखील तुटल्यामुळे बहुतांशी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला . घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, महसूल सहाय्यक महादेव बाबर, बाजीराव काशीद आदि महसूल अधिकारी कर्मचारी देखील पटनास्थळी दाखल झाले. तसेच याबाबत कणकवली तहसीलदार, नगरपंचायत प्रशासन यांना तात्काळ झाड हटवण्या संदर्भात माहिती देण्यात आली. सदरचे झाड हटवण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे.
Home ब्रेकिंग न्यूज कणकवली शहरात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले , प्रशासनाकडून झाड हटवण्याची कार्यवाही सुरू..!





