सावंतवाडी : माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, गैरकायदा जमाव करुन आंदोलन केल्या प्रकरणी आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ४९ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, १९/०१/२०१६ रोजी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी त्यांचेकडील क्र. गृह ५७०१ /१/२०१६ अन्वये दि. १६/०१/२०१६ रोजी रात्री ००.०० वा. ते २७/०१/२०१६ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केलेला असताना आरोपी यांनी गैरकायदा जमाव करून माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे विरोधात घोषणाबाजी करून त्यांचे कार्यालयाच्या दिशेने जात असताना श्रीराम वाचन मंदिराचे समोरील रस्त्यावर बंदोबस्तात असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना मनाई आदेशाबाबत अवगत करूनही सदर ठिकाणी थांबवले, तरी त्यांनी पालकमंत्री यांच्याविरूद्ध घोषणाबाजी, आरडाओरडा, हुल्लड करून दंगा केलेबाबत आरोपी यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम १४३, १४७, १८८ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(२) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.या आंदोलन गुन्हा प्रकरणी आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ४९ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
यात १) श्री. सतिश जगन्नाथ सावंत रा. कणकवली, (२) श्री. नितेश नारायण राणे, रा. कणकवली, (३) श्री. निलेश नारायण राणे, रा. कणकवली, (४) श्री. संदिप मुकुंद कुडतरकर रा. सालईवाडा, सावंतवाडी, (५) श्री. मंदार गुरुनाथ नार्वेकर रा. उभाबाजार, (६) श्री. सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परब रा. सावंतवाडी, (७) श्री. चंद्रकांत दत्ताराम गावडे रा. सालईवाडा, सावंतवाडी, (८) श्री. सुधीर सुरेश आडीवरेकर, रा. जुनाबाजार, सावंतवाडी, (९) श्री. दिलीप चंद्रकांत भालेकर, रा. गवळी तिठा, सावंतवाडी, (१०) श्री. संतोष चंद्रकांत जोईल, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी, (११) श्री. लक्ष्मण उर्फ संतोष सुभाष गावस, रा. सालईवाडा, (१२) श्री. अमित बापु वेंगुर्लेकर, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी, (१३) श्री. सत्यवान शिवराम बांदेकर (१४) श्री. गौरांग नारायण रेगे, रा. सावंतवाडी (१५) श्री. सुरेश सखाराम कोलगावकर, रा. तळवडे, सावंतवाडी (१६) श्री. सुमन दत्ताराम मुळीक, रा. मळेवाड, सावंतवाडी, (१७) श्री. मधुकर विठ्ठल नाईक, रा. कोलगाव, सावंतवाडी, (१८) डॉ. जयेंद्र श्रीपाद परुळेकर रा. सावंतवाडी (१९) सौ. निकीता नारायण जाधव, रा. तळवडे, रा. सावंतवाडी, (२०) श्री. शंकर संभाजी साळगावकर, रा. तळवडे, सावंतवाडी, (२१) श्री. नितीन मुकंद कुरतडकर, रा. फॉरेस्ट ऑफिस जवळ, सावंतवाडी, (२२) श्री. प्रमोद मोहन सावंत, रा. कुणकेरी, सावंतवाडी, (२३) श्री. विकास भालचंद्र सावंत, रा. सावंतवाडी, (२४) श्री. विक्रांत गोपीनाथ आजगावकर, रा. आजगाव, वेंगुर्ला, (२५) श्री. आनंद भास्कर शिरवलकर, रा. कुडाळ (२६) श्री. रुपेश रविंद्र कानडे, रा. कुडाळ, (२७) श्री. रुपेश अनिल बिडये, रा. कुडाळ, (२८) श्री. शिवाजी गोविंद गवस, रा. दोडामार्ग, (२९) श्री. प्रकाश राजाराम सावंत, रा. दोडामार्ग, (२०) श्री. तुकाराम नारायण साळगावकर, रा. वेंगुर्ला, उभादांडा, (३१) श्री. विष्णुदास साजबा कुबल, रा. वेंगुर्ला, नवाबाग, (३२) श्री. निलेश जयप्रकाश चमणकर, रा. उभादांडा, वेंगुर्ला, (३३) श्री. प्रितेश शंकर राउळ रा. रेडी, वेंगुर्ला, (३४) श्री. विष्णु चंद्रकांत परब, रा. परबवाडा, वेंगुर्ला (३५) श्री. वसंत महादेव तांडेल, रा. नवाबाग, वेंगुलां, (३६) श्री. भुषण भगवान सारंग, रा. विठ्ठलवाडी, वेंगुर्ला. (३७) श्री. अशोक यशवंत वेंगुर्लेकर, रा. गावडेश्वर मंदिरजवळ, वेंगुलां, (३८) श्री. सूर्यकांत हरिश्चंद्र भालेकर, रा. खारेपाटण, कणकवली (३९) श्री. गुरूनाथ रघुनाथ सावंत, रा. निमजगा, बांदा (४०) श्री. जावेद हुसेन खतीब, रा. मुस्लिमवाडी, बांदा (४१) श्री. साईनाथ सोनुनाथ धारगळकर, रा. देऊळवाडा, बांदा यांची सावंतवाडी येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी.. आर. आर. बेडगकर साहेब यांनी आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.आरोपी तर्फे अँड. अनिल कृष्णा निरवडेकर, अँड. गणेश प्रकाश चव्हाण, व अँड. अशोक गंगाराम जाधव यांनी काम पाहिले.





