देवगड : फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९६.८८ टक्के एवढा लागला असून न.शा. पंत वालावलकर जुनिअर कॉलेजची देवगड वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आदिती मिलिंद कुबल ९४.८३ मिळून प्रथम क्रमांक तर रोहन दीपक नार्वेकर ९२.६७ टक्के मिळून द्वितीय क्रमांक सिद्धेश उदय सावंत ९१.८३ तृतीय क्रमांक आले आहेत.देवगड तालुक्यातून ११५६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यामध्ये विशेष प्राविण्य ६८ प्रथम श्रेणी ४०८ द्वितीय श्रेणी ५०८ तृतीय श्रेणी १३८ असे एकूण ११२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देवगड मधील देवगड तालुक्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव ज्युनिअर कॉलेज व देवगड हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय या दोन कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे.





