सावंतवाडी : श्री राधाकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्था मळेवाडच्या चेअरमन पदी अर्जुन जयद्रथ मुळीक,व्हा.चेअरमन पदी गोविंद रघुनाथ मुळीक तर सचिव पदी गोपाळ खेमा नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
मळेवाड येथील श्री राधाकृष्ण सहकारी व्यावसायिक दूध संस्थेचा कार्यकाल संपल्याने नवीन कार्यकारणी संचालक मंडळ निवडण्यात आले.आज संस्थेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एम एस धुमाळ यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी उपस्थित संचालक मंडळातून अर्जुन जयद्रथ मुळीक यांचे चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन म्हणून गोविंद रघुनाथ मुळीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर सचिव पदी गोपाळ खेमा नाईक यांची निवड करण्यात आली.मावळते चेअरमन सतीश सातार्डेकर यांनी नवनिर्वाचित चेअरमन,व्हाईस चेअरमन,सचिव,नवनिर्वाचित संचालक मंडळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना नवनिर्वाचित चेअरमन मुळीक यांनी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन गावातील दूध संकलन वाढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून या दूध संस्थेचा विकास व प्रगती होण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे असे आश्वासित केले.नवीन संचालक मंडळामध्ये संचालक म्हणून सतीश कृष्णाजी सातार्डेकर, प्रसाद श्रीधर नाईक,सुरेश वसंत नाईक,प्रज्ञा प्रसाद नाईक,सुषमा सुनील नाईक,प्रकाश लक्ष्मण पार्सेकर,एकनाथ साबाजी गावडे यांचा समावेश आहे.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे उपस्थित होते. त्यांनीही नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.





