डायलेसिस सेंटरवर कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती झाल्याचं पत्र मिळताच चांदोस्करांचं उपोषण मागे…!

देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद असल्याने वेळोवेळी तारखा देऊही ते सुरू होत नसल्याने माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांचे नेतृत्वाखाली डायलिसिस रुग्णाच्या नातेवाईकांनी देवगड ग्रामीण रुग्णालया समोर गुरुवार 25 मे रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. अखेर कर्मचारी प्रतिनियुक्ती करून डायलिसिस सेंटर सुरू करीत असल्याचे लेखी पत्र वैद्यकीय अधिकारी संजय विटकर यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषण स्थळी भाजपा पदाधिकारी योगेश पाटकर, दयानंद पाटील, चंद्रकांत कावले नरेश डामरी, सुधाकर पराडकर, शैलेश लोके, विनय पराडकर, आधी उपस्थित होते. देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंद असल्याने अनेक रुग्णांना डायलिसिस घेणे शक्य होत नव्हते. बऱ्याच वेळा खाजगी डायलिसिस सेंटरमध्ये प्रतीक्षा करावी लागत होती. शिवाय खर्चामुळे ते हैराण झाले होते.
माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक संजय विटकर यांची भेट घेतली व समस्या मांडली मात्र त्यांनी दिलेल्या वेळेतही डायलेसिस सेंटर सुरू झाले नाही. म्हणून योगेश चांदोसकर यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. आमदार नितेश राणे यांनीही याबाबत जिल्हा शिल्य चिकित्सकांशी चर्चा केली. अखेर श्रीम. प्रणाली खानविलकर व तुकाराम मुरकर अशी दोन प्रतिनियुक्ती कर्मचारी नियुक्ती करत असल्याचे लेखी पत्र देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय विटकर यांनी देताच माजी नगराध्यक्ष योगेश चांदोरकर यांनी केलेले हे उपोषण मागे घेण्यात आले .