दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ शिवसेना नगरसेवक स्वखर्चाने काढणार | नगराध्यक्षा देणार महिन्याचं मानधन

देवगड : दहिबाव अन्नपूर्णा नदीवरील नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा देवगड जामसंडे शहरासह मिठबाव दहिबाव नारिंग्रे या तीन गावांना होतो. मात्र आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात वाहून आलेला गाळामुळे नदीपात्र कोरडे बनले आहे. एकीकडे पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना पाण्यावरूनच वादाच्या ठिणग्या देखील उडत आहेत.

गाळ काढा अन्यथा पंपिंग करू देणार नाही असा इशारा असा आक्रमक पवित्रा दहीबाव सरपंच व ग्रामस्थांनी घेत देवगड जामसंडे नळ योजनेच्या पाणीपुरवठा अखेर ज्यांनी बंद पाडला. नगरपंचायतीच्या वतीने पोलीस बंदोबस्त मागून दहिबाव नारिंग्रे मिठबाव या गावातील सरपंचांबरोबर बैठक लावून यशस्वी तोडगा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसात गाळ काढण्याची आश्वासन नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आले. तसेच रात्रीच्या सत्रात 13 तास देवगड जामसंडेचे पाणी पंपिंग करण्याच्या तोडगा देखील यावेळी काढण्यात आला. त्यामुळे पाणी प्रश्नावरून देवगड जामसंडे नगरपंचायत विरुद्ध दहिबाव ग्रामपंचायत मध्ये सुरू झालेल्या वादावर अखेर पडदा पडला.

शिवसेनेचे सर्व नगरसेवक स्वखर्चाने गाळ उपसा करणार आहेत. तर नगराध्यक्षा साक्षी प्रभू या देखील आपले एक महिन्याचे मानधन नदीपत्रातील गाळ काढण्यासाठी देणार असल्याचे त्यांनी नगरसेवक निवृत्ती तारी यांनी सांगितले. दहीबाब नळ योजनेवरून होणारा पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्यासह नगरसेवक निवृत्ती दारी विशाल मांजरेकर यांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह दहिगाव नळ योजनेच्या ठिकाणी धाव घेतली. संबंधित मिठबाव दहिबाव व नारीग्रे या गावातील सरपंच बरोबर बैठक लावून चर्चा करण्यात आली. यावेळी नगरपंचायत पाणीपुरवठा विभाग प्रमुख चारुदत्त पारकर दहिबाव सरपंच सचिन नाचनकर, नारिग्रे सरपंच महेश राणे, मिठबाव सरपंच भाई नरे नगरसेवक निवृत्ती तारी,नगरसेवक विशाल मांजरेकर, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी रोहित पाटील, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व दहीबाव ग्रामस्थ उपस्थित होते.