कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली तलाठीपदी कार्यरत असलेल्या आशिये गावच्या अर्पिता अजित ठाकूर उर्फ सरिता रामचंद्र बावलेकर यांना खारेपाटण येथे मंडळ अधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल आशिये ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या गावातील अधिकारी होत असल्याने विकासात सहकार्य मिळेल,असा विश्वास सरपंच महेश गुरव यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, मानसी बाणे, अविराज मराठे, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गुरव, ग्रामसेवक राकेश गोवळकर, माजी सरपंच सदानंद बाणे, शंकर गुरव, माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, अनिल गुरव, सत्यवान गुरव, सुचिता ठाकूर, शिक्षक निलेश ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





