विश्व वारकरी संघाच्यावतीने सावडाव येथे भजनी बुवांचे सन्मान…!

90

देवगड : कोकणात लोप पावत असलेली पारंपरिक भजन परंपरा जोपासण्याच्या हेतूने आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे या हेतूने सावडाव खलांत्रीवाडी, कणकवली येथे पारंपरिक डबलबारी भजनाचे आयोजन विश्व वारकरी संघ, पंढरपूर ह.भ.प. विजय महाराज राणे ( कोकण विभाग सचिव ) आणि ह.भ.प. जयेश महाराज राजीवडेकर ( कणकवली तालुका उपाध्यक्ष ) यांच्या वतीने करण्यात आले होते.
या डबलबारी भजनी सामन्यात बुवा श्री. आनंद (बाबा) हरम आणि बुवा श्री. महेश पडवळ या दोन्ही भजनी बुवांनी उत्तम रित्या भजन सादरीकरण केले.या कार्यक्रमासाठी ह.भ.प. यशवंत आईर, ह.भ.प. प्रसाद मोरे, उमेश सामंत, प्रमोद पांजरी, अरुण राजिवडेकर, किरण बुवा पडवळ, कु. स्वप्निल बुवा परब, अनिल सावंत, हेमंत सावंत, श्री. विलास घाडी यांची विशेष उपस्थिती होती.
कोकणातील ही कला जोपासत असताना भजन कधीतून भजन कलेचे सादरीकरण करताना संबंधित बुवा कडून कुठलाही अपशब्द उच्चारला जाता कामा नये याची दक्षता घेऊनच आपल्या भजनाचे सादरीकरण चांगल्या पद्धतीने करावे अशी सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आ आली होती त्यामुळे कोणताही अपशब्द न वापरता शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या भजन कलेचे सादरीकरण या दोन्ही बुवांनी केले व त्यांना पखवाज देणाऱ्या त्यांच्या मंडळींचाही आयोजक विश्व वारकरी संघ पंढरपूरच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला .