सलग २० वर्षे विना अपघात सेवा बजावलेल्या चालकांचा ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने सत्कार
कणकवली | मयुर ठाकूर : सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी शासनाने वहातुक नियम केले आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याचा धाक निर्माण केला आहे. म्हणून वाहतुकीच्या नियमांच्या अधिन राहून तुम्ही आणि इतरांना सुरक्षित ठेवा असे आवाहन मोटर वाहन निरिक्षक जितेंद्र पाटील यांनी केले. तसेच व्यक्तीला जीवनात नकारात्मकता निगेटिव्हीटी अवतरली असेल तर ब्रह्माकुमारी विद्यालय आपल्या व्यक्तीमत्वात सुयोग्य बदल घडवेल याचा अनुभव देखील आपण घेतला असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. आपणही आणि आजूबाजूच्या इतरांना देखील ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या राजयोगाचा फायदा करून घ्या असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय १५ ते २१ मे रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. त्याचे औचित्य साधून ब्रह्माकुमारीजच्या ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल विंग आणि सिंधुदुर्ग वाहतूक आरटीओच्या सहकार्याने विना अपघात सेवा बजावलेल्या चालकांच्या सत्काराचा ‘सलाम रथवान’ कार्यक्रमाचे आयोजन जानवली येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्वरीय विश्व विद्यालयाच्या विश्वकल्याणी भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलनाने झाले.यावेळी मोटार वाहन निरिक्षक जितेंद्र पाटील, डॉ.विद्याधर तायशेटे, गोवा सिंधुदुर्गच्या संचालिका राजयोगिनी शोभा बहेनजी, कणकवलीच्या संचालिका संध्या बहेनजी, राजयोगीनी सुरेखा बहेनजी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे टाळा, हेल्मेटचा वापर करा, आपल्या मुलाला मुलीला वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी वेगळं गिफ्ट देण्यापेक्षा हेल्मेट द्या, जेणेकरून पुढील धोका टळेल, कार चालविताना सीट बेल्टचा वापर करा, वाहतूक पोलिसांना घाबरू नका, पोलीस हे तुमची काळजी घेण्यासाठी असतात, सुरक्षिततेसाठी कायदेशीर बोललं जाते त्याचा राग मानू नका, सॉरी बोलणं हे आपल्यासाठी असते ते दुसऱ्यासाठी नसते त्यामुळे वाहन चालविताना सॉरी म्हणावे लागणार नाही. याबाबत सतर्क राहा, मॉर्निंग वॉक ला जाताना डावीकडून न जाता उजवीकडून चालणे जेणेकरून पुढे होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचाल. असेही यावेळी मोटार वाहन निरीक्षक श्री. पाटील बोलत होते.कार्यक्रमा दरम्यान डॉ.विद्याधर तायशेट्ये यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या शोभा बेहेनजी यांनी सांगितले की,जस आपण वाहन चालवतो तसे आपले शरीर आहे. गाडीचा एखादा पार्ट बिघडला की गाडी बंद पडते तसे आपण आजारी पडलो की आपल्या शरीराची गाडी थांबते. ब्रह्माकुमारी संस्थेच्या माध्यमातून एकाच दिवसात पाच कार्यक्रम राबविले जातात. ब्रह्माकुमारी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जागृत करणे हा उद्देश आहे. चालक शब्दांमध्ये लक ( भाग्य ) आहे आणि नियम शब्दात (यम) आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि वाहन चालवा. असे मार्गदर्शन केले.

यावेळी सलग २० वर्षे विना अपघात सेवा बजावलेल्या सरकारी कार्यालयांतील चालकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील संजय तारी, अमितकुमार घाडीगांवकर, दत्तराज चाटे, शैलेश लाड, महेश झालबा, लाडू शेडगे, अरुण जोगळे, संदीप परब, मारुती आंबासे, भारत सिंगनाथ, सदाशिव वाळके, बाळकृष्ण रणसिंग, अस्लम शेख, सूर्यकांत कुबल, इलियास मेहत्तर, श्रीवाद मौर्ये, दत्तात्रय माथेकर, मंदार धिर्लेकर, संदीप कदम, महेश वस्त, राजन साळगावकर, केतन पारकर, रुजाय बारेत, निलेश मयेकर, प्रवीण चव्हाण, प्रवीण पवार, सदानंद ताम्हणकर, संजय केरकर, मधुकर मुंज, अजित राणे, सुभाष घाडीगांवकर, संदीप शिरोडकर, सुनील तारी, संजय राउत, राजेंद्र दुलम, दिलीप साटम, अजितकुमार परमाज, श्यामसुंदर मूळम यांचा मोटार वाहन निरीक्षक श्री. पाटील व ब्रह्माकुमारी संस्थेच्या शोभा बेहेनजी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सलाम रथवान प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या बहेनजी यांनी तर पल्लवी बहेनजी यांनी सुत्र संचालन केले.





