कणकवली | मयुर ठाकूर : मे महिना सुरू झाला की मुंबईकर चाकरमानी वर्ग कोंनक्त मोठ्या प्रमाणात दाखल होतात. कोकणातील विविध कार्यक्रम, सण, उत्सव आणि फावल्या वेळेत थोडीशी मौज मज्जा करण्यासाठी येत असतात. यावर्षी कोकणकात मोठ्या प्रमाणात गर्मी वाढल्याने चाकरमानी वेळेतच मुंबई ला परतीच्या प्रवासाला जाताना दिसून येतात.

काही चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाची वाट धरली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल होऊन धावत आहेत. महिनाभर बहुतांशी रेल्वेगाड्यांचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले असून, बहुतांशी गाड्यांची तिकिटे सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या आसपास प्रतीक्षेत आहेत. काही गाड्यांची वेटिंगलिस्ट ही फुल्ल झाल्या आहेत. सध्या रेल्वेस्थानकावरील तिकीट केंद्रावर प्रवाशांची तिकिटांसाठी मोठी गर्दी होत असून, तिकीट केंद्रासमोर तासनतास प्रवाशांना वेटिंग करावे लागत आहे.

सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्याने मुंबईकर चाकरमानी आपल्या कुटुंबासह गावी दाखल होत आहेत. मे महिन्यात गावी लग्नसमारंभ तसेच धार्मिक कार्यक्रम उरकून मुंबईकर चाकरमान्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला आहे. खासगी आराम बस, अन्य खासगी वाहनांनी गावी येणाऱ्यांपेक्षा कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल धावत आहेत. बहुतांशी रेल्वेगाड्यांचे तिकीट एक-दोन महिने आधीच बुकिंग केली आहेत. तर बरेचजण एक दिवस आधी तत्काळ तिकिटे काढून गावी दाखल होत आहेत. वेटिंग तिकिटांसाठीही मोठी रांग आहे. मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या बहुतांशी रेल्वेगाड्यांच्या तिकीटांची वेटिंग लिस्ट वाढत आहे. सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास वेटिंग आहे. एप्रिल महिन्यात गावी आलेले चाकरमानी मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचीही तिकिटांसाठी गर्दी होत आहे. एकीकडे खाजगी बस गाड्यांचे वाढलेले दर लक्षात घेता प्रवासी रेल्वे गाड्यांवरच विसंबून आहेत.कणकवली रेल्वे स्थानकावर सध्या मांडवी एक्सप्रेस असो वा जनशताब्दी एक्सप्रेस या दिवसा धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी आहे. कोकणातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्यामध्ये काही दिवसांसाठी सुट्यांमध्ये चाकरमानी मुळगावी परतत असतात. त्यामुळे कोकण मार्गावर प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होते. रेल्वेमार्गाचा विचार केला तर तो सगळ्यात स्वस्त असल्याने बहुतेकांची धाव तिकडेच असते. रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने रेल्वेचे आरक्षण कितीतरी आधी फुल्ल होऊन जाते. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटे महाग असली तरीही चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात. विशेषतः आरामदायक व शक्यतो झोपून प्रवासाची सवय असलेले लोक खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसगाड्यांना पसंती देतात. तसेच ते चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी खाजगी ट्रॅव्हल्सना पसंती देत आहेत. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स ज्या ठिकाणी थांबतात त्याठिकाणी चाकरमान्याची गर्दी होत आहे.





