कणकवली : माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या शहर भाजप च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी 10.30 वाजता आ.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कणकवली कंजूमर सोसायटी समोर नगरपंचायत रोडवर हे कार्यालय सुरू करण्यात आले असून, कणकवली नगरपंचायत वर प्रशासक आल्यानंतर आता लोकनियुक्त नगरसेवक निवडी पर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग केला जाणार असल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. नलावडे यांनी केले आहे.





