दोडामार्गची श्रेजल नाईक वेशभूषा स्पर्धेत द्वितीय…!

दोडामार्ग : राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त मातृभूमी शिक्षण संस्थेच्या ‘शिवसंस्कार’ मार्फत ‘भव्य राष्ट्रमाता जिजाऊ वेशभूषा स्पर्धा’ महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये उत्स्फूर्तपणे पार पडली. ही स्पर्धा आयोजित करून शिवसंस्कारने एक आगळीवेगळी मानवंदना जिजाऊ माँ साहेबांना दिलेली आहे. या स्पर्धेत दोडामार्ग (सावंतवाडा) येथील श्रेजल सागर नाईक यांनी खुल्या गटातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्रभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते यातून दोडामार्गच्या सुकन्येने मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.