एका गाईला वाचवण्यासाठी दुसऱ्या गाईची निकराची झुंज | बलाढ्य गव्यांसमोर दोघीही गतप्राण

सावंतवाडी : मळेवाड धनगर वाडी येथील धाकू रामा शेळके यांच्या दोन गायींचा गव्या रेड्याच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात मारल्या म्रुत्यू झाला आहे. मळेवाड धनगर वाडी येथील धाकू रामा शेळके यांची जनावरे माळरानावर चरण्यासाठी गेली होती. या जनावरातील एका गाईवर 6 ते 7 गवा रेड्याच्या कळपाने हल्ला केला. यावेळी त्या गाईने त्यांच्याशी झुंज दिली. यावेळी आपल्या कळपातील गाईवर हल्ला केल्याने दुसऱ्या गाईने गवा रेड्याना हुसकाविण्यासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गवा रेड्याच्या कळपासमोर त्या दोन्ही गाईची झुंज अपयशी ठरल्याने अखेर त्या दोन्ही गाईचा म्रुत्यू झाला. यातील एक गाय गाभण होती. गाईचा म्रुत्यु झाल्याने मालक धाकु शेळके व त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले. या घटनेची कल्पना शेळके यांनी उपसरपंच हेमंत मराठे याना दिल्या नंतर मराठे यांनी वनविभाग व पशुवैद्य अधिकाऱ्यांना संपर्क केला. या नंतर शवविच्छेदन व पंचनामा करण्याकरिता पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव व वनरक्षक आपसाहेब राठोड व वनपाल खोराटे घटनास्थळी दाखल झाले. गवा रेड्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी वनविभागाकडे केली आहे.